Tue. Jul 27th, 2021

‘मोदी’ web series वर निवडणूक आयोगाची बंदी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘PM नरेंद्र मोदी’ या सिनेमाचं प्रदर्शन आधीच अडचणीत आलंय. त्यात आता मोदींवर आधारित ‘मोदी- जर्नी ऑफ कॉमन मॅन’ या वेबसीरिजवरही आता निवडणूक आयोगाने निवडणूक पूर्ण होईपर्यंत बंदी आणली आहे.

वेबसीरिजचे episodes बंद!

‘Modi- Journey of common man’ ही वेबसीरिज Eros Now वर सध्या सुरू आहे.

अभिनेता महेश ठाकूर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहे.

या वेबसीरिजचे आत्तापर्यंत 5 भाग प्रसारित झाले आहेत.

मात्र आता सगळ्या episodes चं streaming तत्काळ थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने इरॉस नाऊला दिले आहेत.

तसंच यापूर्वी प्रदर्शित झालेले आणि Eros now वर उपलब्ध असणारे एपिसोड्सही काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक काळात ही web series दाखवण्याचं कारण?

या वेबसीरिजचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक काळात या web series चं स्ट्रिमिंग करण्याचा आमचा उद्देश नव्हता.

या प्रोजेक्टवर आम्ही गेले वर्षभर काम करत आहोत.

ही वेबसीरिज निवडणुकीच्या खूप आधीच प्रसारित करण्याचा आमचा मानस होता.

मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला ही सीरिज बनवायला उशीर झाला, असं उमेश शुक्ला यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *