Jaimaharashtra news

पश्चिम बंगालच्या प्रचारतोफा 20 तास आधीच थंडावणार

निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगाल मध्ये होणारा हिंसाचार लक्षात घेता प्रचार लवकर थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी कोलकातामध्ये रोड शोचे आयोजन केले होते. मात्र या रोड शो दरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. यामध्ये भाजप- तृणमूल कॉंग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. रोड शोच्या दरम्यान अमित शाहांच्या गाडीवर काठ्या फेकण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्यावर गाडीवर दगडफेक करण्यात आली. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या दमदम, बरसात, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, जादवपुर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या जागांवरील प्रचार 10 तारखेलाच संपणार आहे.

निवडणूक आयोगाकडून या गोष्टींवर बंदी

19 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे.

गुरूवारी रात्री 10 नंतर निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

निवडणूक कालावधीत पश्चिम बंगालमध्ये सतत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार कालावधी 20 तासांनी कमी केला आहे.

त्यामुळे गुरूवारी रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

मुख्य सचिवांकडे या खात्याचा पदभार सोपवण्यात आला असून पश्चिम बंगालच्या गृह सचिवांनाही त्यांच्या पदावरून हटवले आहे.

 

Exit mobile version