Wed. Apr 21st, 2021

हा परिवार 28 वर्षांपासून साजरा करतोय ईको-फ्रेंडली गणेशोत्सव !

जय महाराष्ट्र न्यूज, मुरबाड

 

ईको-फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने काळाची गरज आहे. त्यासाठी सरकार वेगवेगळ्या मार्गाने

जनजागृती देखील करत आहेत. काही भाविक  स्वत:हून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देत आहेत. असेच  मुरबाडमध्ये राहणारे एक 

भाविक शंकर शेलवले त्यांच्या परिवाराच्या सहकार्याने 28 वर्षांपासून त्यांच्या घरी ईको-फ्रेंडली गणपती बसवतात.

 

मागील 28 वर्षांपासून शेलवले कुटुंब गणेशोत्सवादिनी वेगवेगळ्या सजावटीमधून सामाजिक संदेश देत आले आहेत. त्याचबरोबर दरवर्षी हे

कुटुंब पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहेत.

 

काही बडी मंडळी देखील पर्यावरणाच्या सुरक्षेचा संदेश देताना नेहमीच दिसतात परंतु लोकांना संदेश देणे आणि स्वत: आत्मसात करणे

यामध्ये खुप अंतर आहे. 28 वर्षांपासून शेलवले कुटुंब करत असलेले कार्य  अतिशय कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *