Sat. Feb 22nd, 2020

वृक्षारोपण करणारा गणपती बाप्पा!

गणपती बाप्पा झाडे लावतो. पाणी शुद्ध करतो हे जर ऐकलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल ना! मात्र हे खरं आहे. नाशिकच्या सिडको भागातील मूर्तिकार मोरे कुटुंबीयांनी ही आगळीवेगळी संकल्पना राबवली आहे.

पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याची मोरे कुटुंबीयांची गेली अनेक वर्षांची परंपरा हे यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे.

गावरान गाईचं शेण, सेंद्रिय बीज आणि तुरटी वापरून धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीच्या गणेश मूर्ती यंदाच्या वर्षी मूर्तिकार मोरे कुटुंबियांनी बनवली आहे.

पर्यावरण पूरक अशा जवळपास पाचशे ते सातशे मुर्ती यावर्षी मोरे कुटुंबियांच्या कारखान्यात साकरण्यात आली आहेत

शाडूच्या गणेश मूर्ती तयार करत असताना या मूर्तीमध्ये तुरटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडांचं बीज मिश्रित केलं आहे.

तुरटीमुळे विसर्जनानंतर ज्या पाण्यात या मूर्तीचं विसर्जन केलं जातं ते पाणी शुद्ध करण्याचे काम गणेश मूर्तीच्या माध्यमातून होतं.

झाडांचं बीज देखील यात असल्यामुळे मूर्ती विसर्जनानंतर आपोआप झाडांची देखील निर्मिती होते. त्यामुळे या गणेश मूर्ती पर्यावरणाला पुरक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *