ईडी कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवेसना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान, ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती आणि दादरमधील फॅल्ट्स जप्त केले आहे. संजय राऊतांवर ईडीने केलेली कारवाई ही शिवसेनेसाठी मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, कितीही कारवाई केली तरी संजय राऊत आणि शिवसेना घाबरणार नाही, अशी भूमिका राऊतांनी घेतली आहे. तसेच राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईनंतर असत्यमेव जयते, असे ट्विट केले आहे. तसेच कितीही कारवाई केली तरी मी तुमच्या बापाला घाबरत नाही, अशा शब्दात राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा एक रुपया जरी कुठल्या गुन्हेगारी स्वरुपातील असेल आणि त्या पैशाच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केली असेल आणि त्या पैशाच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केली असेल तर ती मालमत्ता भाजपच्या नावे करेल, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022
राऊत म्हणाले, ईडी माझ्या मागे लागली असल्याची कल्पना मला आधीपासून होती. अनेकांना वाटत असेल अशा कारवाईमुळे संजय राऊत आणि शिवसेना खचली आहे, असे अजिबात नाही. सूडाच्या कारवाया असत्य कारवाईपुढे कधीही गुडघे टेकणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच मी घाबरलो नसून महराष्ट्रात केंद्रीय यंत्रणा बेकायदेशीररित्या काम करत असल्याचे गंमत वाटत आहे. तुम्ही जे खोटे कराल ते तुमच्यावर उलटल्याशिवाय रहाणार नाही. तुमची कबर खोदण्यासाठी सुरुवात केली असल्याचेही ते म्हणाले.