ईडीकडून येस बँक संस्थापक राणा कपूर यांना अटक

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ED arrested Rana Kapoor अटक करण्यात आली आहे. राणा कपूर यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
राणा कपूर यांची इडीच्या अधिकाऱ्यांनी 30 तास चौकशी केली. या चौकशीनंतर आर्थिर अफरातफरीच्या आरोपातून कपूर यांना मुंबईतून अटक केली.
येस बॅंक घोटाळा उघडकीस आला. यानंतर शुक्रवारी ईडीने राणा कपूर यांच्या घरी छापे टाकले होते.
छापेमारीनंतर ईडीने राणा कपूर यांना ताब्यात घेत चौकशी केली. यानंतर शनिवारी मध्यरात्री त्यांना अटक केली गेली. दरम्यान राणा कपूर यांना न्यायलयासमोर हजर करण्यात येणार आहे.