Thu. Oct 21st, 2021

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीची छापेमारी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने छापा टाकला आहे. ईडीने देशमुख यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकण्यात आले आहेत.

शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीसुद्धा छापे टाकले होते.

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *