Thu. Dec 2nd, 2021

‘या’ प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्याविरोधात ED कडून गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसंच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

2005 ते 2010 या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून (Maharashtra State Co-operative bank) मोठ्या प्रमाणावर मनमानी पद्धतीने कर्जवाटप झालं होतं.

काय घडलं होतं नेमकं?

NABARD च्या सूचनांचं उल्लंघन करत बँकेच्या संचालक मंडळाने कर्जवाटप केलं.

यामध्ये  9 साखर कारखान्यांना 331 कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला.

24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज देण्यात आलं. याची थकबाकी 225 कोटींची

22 कारखान्यांकडील 195 कोटी रूपयांचं कर्ज असुरक्षित

कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही 478 कोटींची थकबाकी होती.

गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचं कर्ज देण्यात आलं.

लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा 3 कोटींचं नुकसान झालं होतं.

अशा अनेक कंपन्या, कारखाने, गिरण्यांना विनातारण कर्ज दिल्यामुळे बँकेला 25 हजार कोटींचं नुकसान झालं होतं.

तीन वर्षांपूर्वी या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.

चौकशी या प्रकरणी समितीदेखील नेमण्यात आली होती.

या प्रकरणाची चौकशी आता सक्तवसुली संचलनालय (ED) तर्फे केली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रस आणि काँग्रेसचे नेते यामुळे अडचणीत आले आहेतच, मात्र यामध्ये शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांसारख्या नेत्यांचीही नावं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *