ईडीची नंदकिशोर चतुर्वेदीला नोटीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन कंपनीत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणातील महत्त्वाचे सूत्रधार नंदकिशो चदुर्वेदी यांना ईडीने नोटीस बजावली आहे.
ईडीने केलेल्या कारवाईनंतर नंदकिशोर चतुर्वेदी रडारवर आला आहे. मागील ९ महिन्यांपासून ईडी नंदकिशोर चतुर्वेदीच्या मागावर आहे. तर नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर असून त्याचे ठाकरे परिवाराशी जवळचे संबंध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीजची २०१४मध्ये स्थापना.
मार्च २०२० मध्ये संचालक मंडळ बदलले.
मूळ संचालक बाहेर पडले आणि चतुर्वेदी पदावर आले.
नंदकिशोर आणि रिटा चतुर्वेदी संचालकपदी.
कंपनीच्या माध्यमातून विनातारण कर्जवाटप झाल्याचा संशय.
विनातारण कर्जवाटपाचे लाभार्थी श्रीधर पाटणकर असल्याचा संशय.
कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीजच्या माध्यमातून बेनामी मालमत्तेची विल्हेवाट लावल्याचा संशय.