Tue. Aug 9th, 2022

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीची नोटीस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने संजय पांडे यांना समन्स बजावले असून येत्या ५ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

संजय पांडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले. दरम्यान, संजय पांडे यांना ईडीकडून समन्स का बजवण्यात आले, याबाबतचे कारण समोर आले नाही. संजय पांडे यांना मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीचे समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. संजय पांडे यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांना ईडी चौकशीचे समन्स पाठवण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

संजय पांडे यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपला. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पांडे यांची कारकीर्द

 • आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण.
 • १९८६ च्या बॅचमधीलआयपीएस अधिकारी.
 • सुरुवातीला पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त.
 • मुंबईतील पोलीस उपायुक्त रँकचे अधिकारी बनले.
 • १९९२ मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण केली.
 • सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना केली.
 • १९९२-९३ दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात उल्लेख.
 • १९९५ मध्ये मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला.
 • १९९७ आर्थिक गुन्हे विभागात उत्तम काम केले.
 • अनेक आर्थिक घोटाळे उघड केले.
 • २००५मध्ये कारकीर्दीतील २० वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज फेटाळला गेला.
 • २०१५ मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले.
 • ९ एप्रिल रोजी संजय पांडे यांना प्रभारी पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.