सोनिया गांधींना ईडीचे फर्मान

नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी आज ईडी समोर हजर होणार आहेत. तर ईडी विरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. सकाळी ११ वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला गेला आहे. केंद्र सरकार विरोधात आज काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढला आहे . सोनिया गांधींना ईडी चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत .या पार्श्वभूमीवर सोनिया यांच्या समर्थनात काँग्रेस पक्षाने देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय आणि ईडी कार्यालयाजवळ सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.सोनिया गांधी यांची गुरुवारी ईडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या निषेधार्थ आणि सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेस मुख्यालय परिसरात ही घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, सोनिया गांधी चौकशीसाठी येणार असल्याने ईडी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काही ठिकाणी बॅरिकेडींगही करण्यात आले आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी केली जाईल. प्रश्नांच्या पहिल्या टप्प्यात, त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील ज्यांची संख्या १० पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये ती आयकर विभागात कर भरता का? त्यांचा पॅन क्रमांक काय आहे? देशात त्यांची कुठे-कुठे मालमत्ता आहे? परदेशात मालमत्ता कुठे आहे? त्यांची किती बँक खाती आहेत? कोणत्या बँकेत खाती आहात?सोनिया गांधीं यांच्या ईडी कारवाईविरोधात राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण?
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हे स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्र आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९३८मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी या वृत्तपत्राचे प्रकाशन करत होती. १९३७मध्ये नेहरू व ५ हजार स्वातंत्र्य सैनिक या कंपनीत शेअरहोल्डर्स होते. तसंच, या कंपीनकडून अजून दोन दैनिक वृत्तपत्राचे प्रकाशन करत होते. उर्दूमधून कौमी आवाज आणि हिंदीतून नवजीवन. ही कंपनी कोणा एका व्यक्तीची मालकी नव्हती.