Tue. Oct 26th, 2021

अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे

नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने छापे घातले आहे. देशमुख यांच्या कटोल येथील घरी ईडीने पुन्हा छापे घातल्याची माहिती समोर आली आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांच्या कटोल येथील निवास्थानी ईडीने पुन्हा छापेमारी केली आहे. आज सकाळी ईडीचे चार अधिकारी नागपुरात दाखल झाले होते. त्यानंतर ते देशमुख यांच्या निवसस्थानी कटोल येथे गेले.

रविवारी अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. ईडीने आधीच देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केलेली असून, अंमलबजावणी संचलनालयाने काटोल आणि वडविहिरा येथील घरांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस अधिकारी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली करण्यास सांगितले असल्याचा आरोप केलेला आहे. आरोपानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडावर आले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी केली जात असून देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ताही जप्त केली आहे. ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांच्या नागपुरमधील दोन घरांवर धाडी टाकल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *