Maharashtra

देशमुख पिता-पुत्रांना ईडीकडून समन्स; अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ई़डीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. मात्र अनिल देशमुख आजही चौकशीला हजर राहणार नाहीत,अशी माहिती मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहिलं असून तक्रारीची प्रत अद्याप मिळाली नाही नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पलांडे यांची ईडीने चौकशी करुन त्यांना अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांना ईडीने समन्स बजावला होता. पण प्रकृतीचे आणि कोरोनाचे कारण सांगून ही चौकशी ऑनलाईन व्हावी अशी मागणी अनिल देशमुखांनी केली होती.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा १०० कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंद केला होता.

अनिल देशमुखांनंतर ईडीने ऋषिकेश देशमुखांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. वसुली प्रकरणातील चौकशीपासून आपल्याला दिलासा मिळावा म्हणून अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून या आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे.

Jai Maharashtra News

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

7 days ago