Jaimaharashtra news

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचं समन्स; १८ ऑगस्टला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पुन्हा समन्स बजावलं आहे. देशमुख यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
अनिल देशमुखांना पाठवण्यात आलेला हा पाचवा समन्स आहे.

दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा भडीमार सुरु ठेवला आहे. त्यांची मालमत्तादेखील जप्त करण्यात आली आहे. याआधी अनिल देशमुख यांना ईडीकडून चार वेळा समन्स पाठवण्यात आला. मात्र अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. आता पाचव्यांदा समन्स बजावल्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला.

ईडीनं अटक करू नये यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरोधात ईडी आता कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

Exit mobile version