ईडीची कारवाई, परबांचे शक्तीप्रदर्शन

शिवसेना नेतृत्वाचे अत्यंत विश्वासू मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. गुरुवारी सकाळी ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा टाकला.सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ईडीने ही कारवाई केली आहे.परब यांच्या निवासस्थानावरील सुरु असलेली चौकशी सत्र आटोपले आहे . सकाळी ६.३० वाजल्यापासून छापेमारी सुरु होती . १३ तासांपासून चालू असलेली चौकशी संपली आहे. तसेच ईडीचे आधिकारी परबांच्या निवासस्थानातून बाहेर निघाले त्याचवेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांच्या समोरच शिवसैनिकांनी निदर्शने केली आणि भगवा झेंडा फडकावला काळ्या फिती बांधून निषेध केला. परबांवर केलेली ईडीची कारवाई हि सूडबुद्धीनी केली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत यापूर्वी १ नोव्हेम्बर २०२१ रोजी ईडीकडून परब यांना चौकशीसाठी बोलावणेही धाडण्यात आले होते. त्यावेळी, विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी तपासणी मोहीम गुरुवारी राबवण्यात आली. अनिल परब यांचे आर्थिक व्यवहार गेले अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांच्या रडारवर होते. अनिल परब यांच्या खाजगी निवासस्थानावरील चौकशी सत्र आटोपले असून वांद्रयात ईडी अधिकाऱ्यांसमोर शिवसैनिकांची निदर्शने सुरु आहेत. अनिल परबांवरील ईडी कारवाई विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानावरील चौकशी दरम्यान परबांच्या घरातून काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत .
गुरुवारी सकाळी ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा टाकला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर छापा टाकला. गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ईडीने ही कारवाई केली आहे.
परबांच्या या ७ ठिकाणी ईडीची कारवाई :
अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी तपासणी
वांद्रयातील खासगी घरावर तपासणी
दापोलीतील साई रिसॉर्टवर तपासणी
परबांशी निगडित एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी तपासणी
कोथरूड, पुणे – परबांचे निकटवर्तीय विभास साठे यांच्या दोन घरी तपासणी
रत्नागिरी – परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी तपासणी