१२ वी ची परीक्षा मंगळवारपासून, शिक्षणमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना आवाहन

मंगळवारपासून १२ वीच्या परीक्षांना सुरुवात आहे. विद्यार्थी जीवनातील १२ वी चा टप्पा हा महत्वाचा टप्पा समजला जातो. मंगळवार १८ फेब्रुवारीपासून १२ वीच्या परीक्षा सुरु होत आहे.
१२ वीच्या परीक्षेला एकूण १५ लाख, ५ हजार, २७ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. यामध्ये ८ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थ्यांचा तर, ६ लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
या १२ वीच्या परीक्षेसाठी एकूण 3 हजार 36 परीक्षा केंद्रं असणार आहेत.
या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड ?
माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनों बारावीची परीक्षा महत्त्वाची आहे. यामुळे ही परीक्षेला तणावमुक्त होऊन सामोरे जा, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
परीक्षेच्या कालावधीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
तसेच महाविकासआघाडीच्या अनेक मंत्र्यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.