Mon. Jan 17th, 2022

अंड्याला शाकाहरी दर्जा द्या; खा.संजय राऊत यांची राजसभेत मागणी

अंड वेज की नॉनवेज यावर नेहमी चर्चा सुरू असते. मात्र या विषयावर कोणीच उत्तर देऊ शकलेले नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे. सोमवारी राज्यसभेत आयुष मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी ही मागणी केल्याचे समजते आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

अंडे आणि कोंबडीला शाकाहरीचा दर्जा देण्यात यावा अशी आगळी-वेगळी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी राज्यसभेत केली.

राज्यसभेत आयुर्वेदावर आणि आयुष मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा होत असताना संजय राऊत यांनी ही मागणी केली.

तसेच आयुष मंत्रालयाने लवकरात लवकर अंडी शाकाहरी किंवा मांसाहरी असल्याचे जाहीर करावे अशी मागणी मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे.

राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी चौधरी चरण सिंह नामाक विद्यापीठात आयुर्वेदिक अंड्यावर संशोधन करत असल्याचे म्हटलं आहे.

अंडी बनवण्यासाठी कोंबडीला फक्त आयुर्वेदिक खाद्य देत असल्यामुळे अंडी पूर्णपणे शाकाहारी असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *