‘सबका मालिक एक’ साईंच्या दरबारी भक्तांची मांदियाळी
जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
आज शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी भक्तांची रेकॉर्ड तोड़ गर्दी झाली आहे. शनिवार रविवार आणि आज रमजान ईदची सुट्टी सलग तीन सुट्टया आल्याने साईबाबांची संपूर्ण शिर्डी गर्दीने फुलुन गेली आहे.
आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी लांबच लांब भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दरबारी आज ईदनिमित्त भक्तांची रिघ लागली आहे.