Tue. Dec 7th, 2021

नांदेडमध्ये रंगली अनोखी कुस्ती

गीता फोगाट हि एक कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध आहे. हिच्या पावलावर पाऊल टाकत भारतातील अनेक मुली कुस्तीकडे वळल्या आहेत. कुस्ती या खेळामध्ये मुलीही मुलांच्या बरोबरीने तसेच तेवढ्याच ताकदीने कुस्तीमध्ये आपले नाव कोरत आहेत. याचे उत्तम उदाहरण नुकतचं नांदेडमध्ये पहायला मिळाले. नांदेडमधील एका यात्रेमध्ये एका मुलीने कुस्तीमध्ये मुलाला चितपट केल्याचे दृश्य पहायला मिळाले.

नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथील घमा देवीची यात्रा ही पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या यात्रेमध्ये एक आहे. या यात्रेमध्ये कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या दंगलीत एका मुलीने कुस्तीत मुलाला हरवून चांगलीच रंगत आणली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा येथील सविता दत्ता कोमलवार असे मुलीचे नाव असून ती आठव्या वर्गात शिकत आहे. या मुलीने मुलासोबत कुस्ती खेळून पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरा उंचावल्या आहेत.

सविताने एक हजार रूपये पारितोषिक असलेली कुस्ती जिंकून अनेकांची मने जिंकली आहेत. या भव्य कुस्तीच्या पटांगणात या मुला-मुलीची कुस्तीची रंगत जवळपास वीस पंचवीस मिनिटे चालली. यामुळे कुस्ती पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये मुलगा जिंकणार की मुलगी जिंकणार हे पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

सविता कोमलवार वयाच्या नवव्या वर्षापासूनच कुस्ती खेळण्यात चांगली पटाईत आहे. कुस्त्यांच्या रंगणाऱ्या दंगलीमध्ये आता मुलीही कमी राहिल्या नाही. हे घमादेवी यात्रेमध्ये चौदा वर्षांच्या सवीता दत्ता कोमलवार या मुलीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *