Mon. Jan 17th, 2022

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र!

शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यात भाजपचा (BJP) झेंडा पुन्हा एकदा जिल्हापरिषदेवर फडकला आहे.

या वेळेस माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे एकत्र आल्याचं बघायला मिळालं. तर आज पुन्हा एकदा जिल्हा परिषद सभापती निवड प्रक्रियेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज जळगावच्या (Jalgaon) शासकीय विश्रामगृहात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आल्याचं बघायला मिळालं.

गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमधील विवाद हे उघडपणे दिसू लागले होते तर आपली राजकारणातील कारकीर्द संपवण्यासाठी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वरिष्ठांकडे नाराजी दाखवत आपले तिकीट कापलं असल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला होता.

दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींकडे यासंदर्भात पुरावे सादर केले होते आणि कारवाईची मागणी केली होती.

त्यानंतर जिल्हा परिषद (Zilla Parishad) अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसे (Eknath Khadse) आणि महाजन एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं. रविवारी पुन्हा एकदा सभापती निवड प्रक्रिया चर्चेत दोघांनी एकत्र येत विचार विनिमय केला आहे. तर आपले मनोमिलन झालेले असून या पुढच्या सर्वच निवडणुका (Elections) एकदिलाने एकसंघ होऊन आपण लढणार आहोत अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) चार सभापतींच्या निवडीसंदर्भात तब्बल 45 मिनिट हे बैठक चालली. या सभापतींची नावं घोषित करण्यात येईल असेही महाजन यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *