Mon. Jan 17th, 2022

एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर; कुपोषणाच्या मुद्यावरून सरकारला झापले

राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा तिसरा दिवस असून भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा सरकारलाच धारेवर धरले आहे. एकनाथ खडसे यांनी आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावर सरकारला जाब विचारल्याने त्यांनी विरोधकांची भूमिका मांडली असल्याचे चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं ?

राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.

आज अधिवेशन सुरू असताना भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी आजच्या दिवशीच दोन वेळा सरकारला झापलं.

एकदा सौरपंपाच्या विषयावरून तर दुसऱ्यांदा आदिवासी भागातील कुपोषणाबाबत सरकारला धारेवर धरले.

युतीच्या काळातच सर्वात जास्त कुपोषण झाले असल्याचे एकनाथ खडसे यांनी आरोप केला.

या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्री अशोक उईके यांनी त्वरीत 30 तारखेपर्यंत लागू करणार असल्याचे सांगितले.

यंदाही मंत्रिपदासाठी एकनाथ खडसे यांच्या नावाचा विचार केला नसून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे ते नाराज आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *