Sun. Jun 13th, 2021

एकनाथ खडसे बंडखोरी करणार ?

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असून राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस यांनी यादी जाहीर केल्यानंतर भाजपाने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र या यादीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना वगळण्यात आल्यामुळे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी यादीमध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समावेश नसल्यामुळे अनेकांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यादीत नाव नसताना उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बंडखोरी करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे ?

गेल्या 42 वर्षापासून पक्षाचे काम करत असून प्रामाणिक राहिलो हा गुन्हा असेल तर तो मी केला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

अनेक वेळा आपल्याला प्रलोभना अली, पक्ष सोडून देण्याचा दबाव टाकण्यात आला. मात्र कधीच बळी पडलो नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

42 वर्षाचे काम पाहून पक्ष तिकीट देईल अशी आशा  करतो अशी खंत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरताना व्यक्त केला आहे

तसेच मुहूर्त चांगला असल्यामुळे अर्ज भरला असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *