Sun. Mar 7th, 2021

पक्षात येणाऱ्या लोकांची निष्ठा तपासून घ्या – एकनाथ खडसे

इतर पक्षांमधून भारतीय जनता पक्षात येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा ओढा वाढला आहे. मात्र ते स्वार्थासाठी येत आहेत आपण सत्तेत आहोत म्हणून येत आहेत. मात्र त्यांच्या निष्ठा तपासून पाहण्याची गरज आहे ज्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशांना पक्षात घेऊ नये असे स्पष्ट विचार माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे व्यक्त केले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

नुकतीच जळगाव येथे लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथ व शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीमध्ये माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांविषयी आणि कार्यकर्त्यां विषयी आपली स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली होती भाजपमधे प्रवेश करणाऱ्यांबद्दल त्यांनी पक्षाला सूचना दिल्या होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांना पक्षवाढीसाठी पक्षात घेणेही आवश्‍यक आहे. परंतु, त्यांच्या निष्ठाही काळजीपूर्वक तपासायला हवी, नाहीतर आपल्याकडे येऊन आपल्याच विरोधात काम करतील. ज्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पक्षात घेऊ नये अशी सूचना खडसे यांनी पक्षाला केली आहे.

खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत खडसे यांच्या बँकेतून आर्थिक व्यवहार झाल्याचा पुरावा देत डी डी सादर केले होते, यावर खडसे यांनी ते डीडी बनावट असल्याचे सांगत यासंबंधीचा खटला मुंबई हायकोर्टात दाखल होता त्यासंदर्भात दमानिया यांच्या याचिकेनंतर खडसे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.

विधानसभेसाठी मुक्ताईनगर येथून उमेदवारी ची आपण मागणी करणार,रोहिणी खडसे नव्हे तर आपणच इच्छुक, पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *