Thu. Oct 21st, 2021

जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

पुण्यातील भोसरी एमआयडीसीप्रकरणी मंदाकिनी खडसेंनी केलेल्या खरेदी व्यवहाराची माहिती एकनाथ खडसेंना होती असे निरीक्षण नमूद असणारा आदेश मागे घेण्यात यावा असा विनंती

अर्ज एकनाथ खडसेंनी झोटींग समितीसमोर सादर केला.

 

सोबतच झोटींग समितीच्या कार्यकक्षा नव्यानं निर्धारित करण्यात यावा, असा अर्ज देखील यावेळी सादर करण्यात आला होता. पण खडसेंचा हा अर्ज फेटाळण्यात आला.

 

न्यायमुर्ती झोटिंग यांनी एकनाथ खडसे यांनी भोसरीतील जमीन प्रकरणात वारंवार भूमिका कशी बदलली, त्यांना या जमीन खरेदी व्यवहाराची पूर्ण माहिती होती, त्यासोबतच त्यांची पत्नी

मंदाकिनी खडसे यांनी कोणत्या तारखांना उकाणीसोबत आर्थिक व्यवहार केलेत, त्याबाबतची संपूर्ण माहिती नमूद केलेली आहे.

 

त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी भर पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *