खडसेंचा पाय आणखी खोलात
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातील कथित भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एफआयआर नोंदवल्याने भाजप नेते एकनाथ खडसे हे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
खडसे यांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावे प्रचंड माया जमवली असून आपल्या पदाचा व राजकीय वजनाचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
खडसेंनी शेकडो-हजारो कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ता खरेदी केली असल्याचा आरोप करत याविषयी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
अंजली दमानिया व अन्य चार जणांनी ही जनहित याचिका केली असून त्यावर उच्च न्यायालयात येत्या काही दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.