Wed. Oct 5th, 2022

वारकऱ्यांच्या मदतीला धावले ‘एकनाथ’

मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना लागेल ती मदत करा मी आहे, असं बोलताना दिसत आहेत.सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.आषाढी वारी अगदी २-३ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागले होते. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द ‘एकनाथ’ धावून आले सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी शिंदे यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.

दिंडीत वाहन घुसून जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ वारकरी जखमी झाले आहे. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या वारकऱ्यांची विचारपूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांना दिली आहे. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Eknath Shinde | वारकऱ्यांच्या मदतीला धावले ‘एकनाथ’ | Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.