Jaimaharashtra news

वयोवृद्ध दांपत्याला चालक आणि महिला वाहकाकडून बेदम मारहाण

पालघर : एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांची दादागिरी समोर आली आहे. चालक आणि महिला वाहकाकडून वयोवृद्ध दांपत्याला बेदम मारहाण करण्यात आली. दोन्ही कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध दांपत्याला लाथ्या बुक्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना वाडा बस डेपोतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. करण ? रस्त्यात खड्डे आल्यास बस सावकाश चालवण्यास सांगिल्याचा राग आल्याने कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. बोईसर बस डेपोतील चालक गोरखनाथ नागरगोजे आणि वाहक महिला शीतल नितीन पवार यांच्या कडून मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना वाडा बस डेपोतील सीसीटीव्हीत कैद झाली असून घटनेनंतर चालक आणि वाहक दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.

Exit mobile version