Mon. Jan 17th, 2022

विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

  भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ८ पैकी ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या एकूण ८ जागांचा कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील २, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर या ६ जागांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १६ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात येणार आहेत. तसेच २३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. ८ पैकी ६ जागांसाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक पार पडणार असून १४ डिसेंबरला मतमोजणी होणरा आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *