Tue. Sep 28th, 2021

निवडणुकीचे एक्झिट पोल ट्विटवरून हटवण्यात यावेत -EC

लोकसभा निवडणुकीचे (एक्झिट पोल) ट्विटवरून हटवण्यात यावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला दिले आहेत. लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा अजून व्हायचा आहे. तर अशा पोलचा या मतदानावप परिणाम होवू शकतो. या पोल संदर्भातील तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक निवडणुकीदरम्यान एक्झिट पोलद्वारे निकालाचे अंदाज मिडीयाकडून दाखवले जातात.

एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाची नजर

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ला जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी तीन दिवस बाकी आहेत.

मतदानाचे टप्पे संपताच देशभरातून निवडणूक अंदाज येण्यास सुरुवात होणार आहे.

प्रत्येक निवडणुकीदरम्यान एक्झिट पोलद्वारे निकालाचे अंदाज मिडीयाकडून दाखवले जातात.

यावेळीही  निवडणूक आयोगाची या  एक्झिट पोल वर चांगलीच नजर असणार आहे.

गेल्या काही दिवसात  मीडिया संस्थांकडून हे  एक्झिट पोल  ट्विटरवर  प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या मीडिया संस्थांना या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली असल्याचही सांगण्यात येत आहे.

निवडणूक अंदाज जारी करणाऱ्या या अंदाजांकडे आता निवडणूक आयोग सुद्दा लक्ष ठेवणार आहे.

निर्वाचन आयोगाने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरलाही एक्झिट पोल हटवण्याचे आदेश दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *