Thu. Jul 18th, 2019

निवडणूक आयोग मोदी हिताचे निर्णय घेत आहे – काँग्रेस

0Shares

निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगाल मध्ये होणारा हिंसाचार लक्षात घेता प्रचार लवकर थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. 19 मे रोजी मतदान होणार असून  गुरूवारी रात्री 10 नंतर निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. पण निवडणूक आयोगाकडून घेतलेला या निर्णयावरून काँग्रेसने आयोगावर टीका केली आहे.प्रचार करण्यापासून रोखणं घटनाविरोधी असून निवडणूक आयोग मोदीहिताचे निर्णय घेत आहे अशी टीका काँग्रसकडून करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेवून ही टीका केली आहे.

काँग्रेसची आयोगावर टीका

19 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे.

गुरूवारी रात्री 10 नंतर निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

निवडणूक कालावधीत पश्चिम बंगालमध्ये सतत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार कालावधी 20 तासांनी कमी केला आहे.

त्यामुळे गुरूवारी रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

प्रचार करण्यापासून रोखणं हे घटनाविरोधी आहे. असं मत काँग्रेसने केला आहे.

निवडणूक आयोग मोदी हिताचे निर्णय घेत आहे असं हि ते म्हणाले आहेत.

‘पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेला फायदा होईल म्हणून असा निर्णय घेतला

पंतप्रधान आणि अमित शहा रोज आचारसंहितेचा भंग करतात त्यावर काही हालचाली होत नाहीत.

निवडणुकीची आचारसंहिता म्हणडो मोदीसंहिता झाली आहे असं मटलं आबे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *