Wed. Jan 19th, 2022

…म्हणून मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

लोकसभा निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.निवडणुकांच्या तारखा जवळ येत असल्याने राजकिय पक्ष देखील आपल्या उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. टीव्ही वाहिन्यांमधील मालिकांमधून देखील विविध सरकारी योजनांचा प्रचार केला जात आहे.याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने असा प्रचार करणाऱ्या टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना ही नोटीस पाठवली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून निर्मात्यांना नोटीस

झी आणि अँड टीव्हीवरील मालिकांमधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार केला जात आहे.

यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी काँग्रेसतर्फे करण्यात आल्या होत्या.

या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे.

झी टीव्ही व अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या दोन्ही टीव्ही वाहिन्यांच्या मालिका निर्मात्यांना 24 तासांत त्यांचे म्हणणे मांडण्यास  सांगण्यात आलं आहे.

त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल. असं आयोगाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *