Sat. May 25th, 2019

लवकरच लोकसभा महासंग्रामाची तारीख जाहीर होणार?

28Shares

लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

केंद्रिय निवडणुक आयोगाने आज रविवारी सायंकाळी 5 वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असल्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त  करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या  तारखांची घोषणा होतील.

निवडणुकांची घोषणा करतानाच आचारसंहिता लागू होतील .

या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे  देशाचं लक्ष लागून राहिल आहे.

 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सक्रीय

युद्धाची वातावरण असल्याने  निवडणूका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता होती.

भारत-पाकिस्तानामध्ये तणाव असला तरीही लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतचं होतील, असं निवडणूक आयोगाने 1 मार्चला स्पष्ट केलं.

ईव्हीएम मशीनला लोकांनी फुटबॉल बनवण्याची खंत निवडणूक आयोगानं व्यक्त केली.

एप्रिल आणि मे या महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका होऊ शकतात.अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रचारात जवानांचे फोटो वापरू नका अशी ताकीद निवडणूक आयोगाने राजकिय पक्षांना केली आहे.

रविवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन  निवडणूक आयोगाने  केले आहे.

दरम्यान  लोकसभा निवडणुकांच्या वेळी परत एकदा नरेंद्र मोदी VS राहुल गांधी अशी लढाई पाहण्यास मिळणार आहे

डिसेंबर महिन्यात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही.

त्यामुळे या निकालांमधून धडा घेत भाजपानं तयारी सुरू केली.

तर 5 पैकी 3 राज्यांत काँग्रसची सत्ता असल्यानं काँग्रेसचे कार्यकर्तेही उत्साहानं तयारीला लागले आहेत.

आता लोकसभा निवडणुकांमध्ये पुढं काय होणार?

जनता पुन्हा मोदींना कौल दोणार का? असं वेगळचं चित्र पाहायला दिसणार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *