Sat. Sep 18th, 2021

छाप्यांची पूर्वसूचना द्या; EC ने खडसवले

प्राप्तिकर विभागाने ऐन निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात जे छापे टाकले त्यावर निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने या कारवाईची दखल घेत आयकर विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. तुम्हाला जर छापा टाकायचा असेल तर केंद्रीय निवडणूकआयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना याची पूर्वसूचना द्या, अशा शब्दात आयोगाने अधिकाऱ्यांना सांगितले.  निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने छापा घालण्याचे सत्र चालूच आहे. पण हे छापे घालण्यापूर्वी  निवडणूक आयोगाला पूर्वकल्पना देत नसल्याने आयकर विभाग खडसवण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाकडून आयकर विभागाला तंबी

निवडणूकांच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रात सर्वच स्तरावर सतर्कता असते.

याच काळात आयकर विभागाच्या छापा सत्रांना ऊत येत असतो.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले होते.

सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात हे छापे टाकले जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे

काँग्रेसच्या तक्रारीनंतर आयोगाने गंभीर दखल घेत आयकर  विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये आयकर विभागाने छापे टाकले होते.

त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आयकर विभागाला यश आलं होतं.

पण यासंबंधी निवडणूक आयकर विभागाला धारेवर धरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *