Jaimaharashtra news

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची निती आयोगाची शिफारस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भूमिकेपाठोपाठ निती आयोगानेही त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

 

2024 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस आयोगाने केली.

 

निती आयोगाने तीन वर्षांसाठीच्या अहवालाचा मसुदा तयार केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या शिफारशीबाबत विचार करावा आणि त्यासंदर्भात रूपरेषा

तयार करण्यासाठी संबंधितांचा कार्यगट नेमावा, अशी सूचना निती आयोगाने निवडणूक आयोगाला केली.

Exit mobile version