Sun. May 16th, 2021

रमजान महिन्यात निवडणुका नको; मुस्लिम धर्मगुरुंचा आक्षेप

निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. लोकसभा निवडणूक देशात सात टप्प्यात होणार असून बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकींच्या तारखांमुळे वाद निर्माण झाला आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदानाची तारीख रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लिम नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रमजान महिन्यात येणाऱ्या तारखा बदलण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुस्लिम नेत्यांची मागणी काय ?

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकांची घोषणा केली.

देशात सात टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मात्र पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशात मुस्लिम नेत्यांनी निवडणुकींच्या तारखा रमजान महिन्यात येत असल्यामुळे तारखा बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

6 मे पासून रमजानचा महिना सुरू होत आहे.

त्यामुळे मुस्लिम समाजासाठी रमजान महिन्यात निवडणूक घेऊ नका, अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे.

मदरसा जानिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी निवडणुकांच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे.

मुस्लिम समाज यावेळी रोजा आणि पठण करतो त्यामुले निवडणुकीत मतदान करणं शक्य होणार नसल्याचे मुफ्ती म्हणाले.

तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत केँद्रीय निवडणूक आयोगाने पुर्नविचार करावा अशी मागणी केली.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *