Thu. Jun 17th, 2021

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर घेणार शरद पवारांची भेट

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर शरद पवार यांना भेटणार आहेत. सकाळी ११ वाजता ही भेट होणार असून पवार-किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्येपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून भूमिका बजावली होती. आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट नेमकी कशासाठी होत आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. या भेटीमधून राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय असणाऱ्या आघाडीबाबत काही बोलणी होऊ शकतात का, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *