Sun. Mar 24th, 2019

दोन ते तीन दिवसांतच लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त ठरणार?

78Shares

लोकसभा निवडणूक 2019 चं बिगुल केव्हा वाजणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार असल्याचं दिसतं.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करेल याची माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक आयोगाकडून यंदाची लोकसभा निवडणूक ही 7 ते 8 टप्प्यांमध्ये घेतली जाऊ शकते.

लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळी बदल करण्याची आवश्यकता वाटत असेल तर त्याबाबत कळवावं, असंही पत्रात नमूद केलं आहे.

मतदानाचं  नियोजन  कसं असणार

लवकरच केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करणार असल्याचं समजतं.

यंदाची लोकसभा निवडणूक ही 7-8 टप्प्यांमध्ये घेतली जाणार.

निवडणुकीची घोषणा या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरूवातीला होऊ शकते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयी राज्यातील निवडणूक आयोगांना पत्र पाठवलं आहे.

मागील निवडणुकींचा आढावा

तरी यात 2014 निवडणुकांमध्ये बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात येतील.

मागील लोकसभा निवडणुकींचा इतिहास पाहता 2004 मध्ये 4 टप्प्यांमध्ये मतदान घेतले गेले.

तेव्हा 29 फेब्रुवारी रोजी निवडणुकीची घोषणा करून पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आली होती.

तसेच 2009 मध्ये 2 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा करून पाच  टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आलं.

16 एप्रिल 2009 रोजी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होऊन 13 मे रोजी अखेरचा टप्पा पार पडला होता.

मागील लोकसभा निवडणुकींची घोषणा 5 मार्च ला करण्यात आली होती.

तेव्हा 9 टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती.

म्हणून यंदा दोन ते तीन दिवसांतच केंदीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूकांची घोषणा करू शकते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *