Tue. Aug 9th, 2022

राज्यातील २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट२०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट२०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

राज्यातील जवळपास ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका पार पडतील. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे एका बाजूला शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील महाविकासाघाडी सरकार टिकणार की गडबडणार असे चित्र समोर आले आहे. या प्रश्नामुळे
राज्य पातळीवर राजकारण तापले आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावपातळीवरही राजकारण तापणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीच्या निवडणूका –
नाशिक -४०
धुळे – ५२
जळगाव – २४
अहमदनगर – १५
पुणे – १९
सोलापूर – २५
सातारा – १०
सांगली – १
औरंगाबाद -१६
जालना – २८
बीड – १३
लातूर -९
उस्मानाबाद – ११
परभणी – ३
बुलढाणा – ५

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.