समुद्रात बुडणाऱ्या 2 हत्तींच्या सुटकेचा थरार
वृत्तसंस्था, श्रीलंका
श्रीलंकेत समुद्रात बुडणाऱ्या दोन हत्तींना वाचवण्यात श्रीलंकन नौदलाला यश आलं. श्रीलंकेच्या त्रिंकोमली समुद्रात दोन हत्ती पोहता पोहता खोल समुद्रात गेले. त्यानंतर ते बुडत असल्याची माहिती तेथील नौदलाला देण्यात आली.
नौदलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाण्यात असलेल्या त्या दोनही हत्तींना दोरीच्या सहाय्यानं किनाऱ्यापर्यंत पोहोचवलं.