Mon. Jun 14th, 2021

रेल्वे ट्रॅकवर आला हत्ती, पुढे काय घडलं…

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटवर केलेल्या रेल्वे स्टेशनवरील अनाऊसमेंटची ही विचित्र पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. ‘प्रवाशांनो कृपया लक्ष द्या… गजानन एक्स्प्रेस काही वेळातच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून जाईल. आपाआपले कॅमेरे बाहेर काढा आणि सुरक्षित अंतर ठेवा’, अनेकदा जंगलातील प्राणी हे रस्त्यावर येतात असचं काही रेल्वे ट्रॅकवर झाल्यचं समोर येत आहे .

रेल्वे ट्रॅकवर अचानक आलेल्या हत्तीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गजानन एक्स्प्रेस ही कोणती नवी एक्स्प्रेस बरं? आणि त्यासाठी कॅमेरा का बाहेर काढायला हवेत? असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनात पडला असणार तर ही गजानन एक्स्प्रेस म्हणजे चक्क तुमचा आमचा लाडका जम्बो अर्थातच हत्ती.

रेल्वे ट्रॅकवर एक्स्प्रेसच्याऐवजी चक्क हत्तीची स्वारी आली हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत रात्री झाल्याचं दिसत आहे. तसं स्टेशनवर कुणीच नाही. स्टेशन अगदी सुनसान झालं आहे. तिथून रेल्वे ट्रॅकवरून अचानक एक हत्ती डुलत येताना दिसतो. रेल्वे ट्रॅकवरून तो छान चालताना दिसत आहे. जणू काही हा रेल्वे ट्रॅक कोणत्या रेल्वेचा नाही तर त्याच्याच मार्ग आहे. त्याच्यासाठीच तो बांधण्यात आला आहे. हत्ती एका दिशेने येतो आणि दुसऱ्या दिशेला शांतपणे चालत जातो. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *