‘मथुरेचा वाद चार महिन्यात मिटवा’

मथुरा यथील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मथुरेचा वाद चार महिन्यात मिटवा, असे आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिले आहेत. श्रीकृष्ण वादावर सुनावणी करताना अलाहाबाद न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका मथुरा न्यायालयात करण्यात आली आहे. याप्रकरणी मथुरेचा वाद येत्या चार महिन्यात मिटवण्याचे आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिले आहेत. श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करणारी याचिका मथुरा न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच न्यायालयात सुरू असलेले अनेक प्रकरणांवर सुनावणी देण्याची मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान, सप्टेंबर २०२०मध्ये मथुरेच्या न्यायालयात दावा करण्यात आला होता की, १९६९मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा समिती आणि शाही ईदगाह प्रजतनिया समितींमध्ये झालेला करार पूर्णत: बेकायदेशीर होता, कारण श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा समितीला असा कोणताही करार करण्याचा कायदेशीर अधिकार नाही.