एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक

टेस्लाचे सीईओ आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिले असणाऱ्या एलॉन मस्क यांनी आता ट्विटर हे समाज माध्यम विकत घेतले आहे. ४४ अब्ज डॉलरचा एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबत करार केला असून ट्विटर वर ‘फ्री स्पीच’ आणायचे म्हणून हा करार केल्याचं मस्क म्हणाले आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून गणले जाणारे तसेच टेस्ला कंपनीचे सीईओ असलेले एलॉन मस्क यांच्या ट्विटर विकत घेण्याबाबत माध्यमांमध्ये गेले अनेक दिवस चर्चा होती. सुरुवातीला ४३ अब्ज डॉलरला ट्विटर विकत घेण्यासाठी एलॉन यांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, ट्विटर त्यापेक्षा चांगली किंमत मिळते का याच्या शोधात होते. अखेर ट्विटरने एलॉन मस्क यांच्या प्रस्तावावर फेरविचार करत ४४ अब्ज डॉलरचा करार संमत झाला. ट्विटर फ्री-स्पीच असावं, त्याबरोबरच त्यात नवीन काही फिचर टाकावेत या उद्देशाने मस्क यांनी हा करार केला आहे.
🚀💫♥️ Yesss!!! ♥️💫🚀 pic.twitter.com/0T9HzUHuh6
— Elon Musk (@elonmusk) April 25, 2022