तुमच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील, सचिनची भावूक पोस्ट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक भावूक पोस्ट केली आहे. यात त्याने सर रमाकांत आचरेकरांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

सर रमाकांत आचरेकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी 2 जानेवारी 2019 ला आचरेकर सरांच निधन झालं होतं.

तुमच्या आठवणी आमच्या मनात सदैव राहतील, अशा शब्दात सचिनने सर आचरेकरांना आदरांजली वाहिली.

रमाकांत आचरेकरांनी प्रसिद्ध आणि यशस्वी क्रिकेटरांची फौज तयार केली.

यामध्ये सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, अमोल मजूमदार, लालचंद राजपूत अजित आगरकर यासारख्या अनेक खेळाडूंना आचरेकरांनी क्रिकेटचे धडे दिले.

Exit mobile version