दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधारला चक दे गर्लनं केलं क्लीन बोल्ड
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार झहीर खानला चक दे गर्ल सागरिका घाटगेनं क्लीन बोल्ड केलं. प्रेमाच्या मैदानात सागरिकानं झहीरची विकेट घेतली.
झहीर आणि सागरिकाचा नुकताच साखरपुडा झाला. झहीरनं आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अनेक कार्यक्रमांना दोघांनीही जोडीनं उपस्थिती लावल्यानं त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगत होती. आता तर दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.