त्रालमधील चकमकीत 2-3 दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

पुलवामा हल्ल्यानंतर सीमेवरती चकमकी सुरूच आहे.जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली आहे.या चकमकीत दोन ते तीन दहशतवादयांना घेरले असल्याच सांगण्यात येत आहे. तसेच काल झालेल्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी कारवाई केली यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

सीमेवर चकमकी सुरुच

जम्मू-काश्मीरमध्ये त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली.

या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळाली आहे.

शोपियान जिल्ह्यातील कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा घालण्यात जवानांना यश आलं आहे.

शनिवारी शोपियानमधील चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले.

राहिल राशिद शेख आणि बिलाल अहमद अशी त्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत.

Exit mobile version