Tue. Apr 7th, 2020

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छनिवृत्तीचा निर्णय घेतला असून राजीनामा दिला आहे. प्रदीप शर्मा यांनी आपला राजीनामाचा अर्ज पोलीस महासंचलकांकडे सोपवला आहे. मात्र अद्याप महासंचालक कार्यालयाकडून या अर्जाला मंजूरी दिलेली नाही. प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे सर्व स्थरावर याची चर्चा सुरू आहे. तसेच त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

1983 रोजी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलात प्रवेश केला.

प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते.

2008 साली प्रदीप शर्मा यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.

2017 साली पुन्हा पोलीस सेवेत काम करण्यासाठी कार्यरत झाले होते.

प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केल्यामुळे त्यांना एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख मिळाली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *