Tue. Sep 17th, 2019

World Cup 2019: इंग्लंडचा बांगलादेशवर 106 धावांनी दणदणीत विजय

0Shares

विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात इंग्लंडने बांग्लादेशसमोर तब्बल 387 धावांच आव्हान ठेवले होते. या सामन्यात बांगलादेशवर 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जेसन रॉयने या सामन्यात 153 धावांची खेळी केली. यामुळे जेसन रॉयला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात ४ गुण जमा झाले.इंग्लंड गुणतालिकेत २ क्रमांकावर पोहोचले आहे.

इंग्लंडचे 387 धावांच आव्हान

सलामीवीरांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने 387 धावांच आव्हान ठेवलं आहे.

सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो 51 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या जो रूटचा 21 धावांत  त्रिफळा उडला.

जेसन रॉयनेदीडशतकी खेळी केली. तो १५३ धावांवर बाद झाला. रॉयच्या या खेळीत १४ चौकार आणि ५ षटकांचा समावेश होता.

यानंतर मैदानात उतरलेल्या जॉस बटलरने ६४ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ३८६ धावा केल्या.

बांगलादेशचा डाव 280 धावांवर संपुष्टात

इंग्लंडने दिलेल्या  387 धावांच आव्हान पेलताना  बांगलादेश संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली.

सलामीवीर सौम्य सरकार अवघ्या 2 धावांवर त्रिफळाचीत झाला. तर तमिम इक्बालला 19 धावांवर तंबूत परतला.

मुशफिकूर रहीम आणि शाकीब अल हसन यांनी  तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी रचली.

मुशफिकूर रहीम 44 रणांवर बाद झाला.  मोहम्मद मिथूनला भोपळाही फोडता आला नाही.

एकाबाजूने फटकेबाजी सुरू ठेवत शाकीबने आपले शतक पूर्ण केले. त्याला अन्य फलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही.

शाकीब 121 धावा काढून बाद झाला. यानंतर बांगलादेशचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिले.

अखेर 48.5 षटकांत बांगलादेशचा डाव 280 धावांवर संपुष्टात आला.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *