#WorldCup2019 इंग्लंडचा दणदणीत विजय; उपांत्य फेरीत दाखल

World Cup 2019 सुरू असून बुधवारी न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने विजयी मिळवला आहे. इंग्लंड विजयी ठरल्यामुळे इंग्लंडला उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला 306 धावांचे आव्हान दिले होते. मात्र न्यूझीलंडला विजयासाठी दिलेले 306 धावांचे आव्हान पूर्ण करू शकले नाही. इंग्लंड संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने संघाला 306 धावा बनवण्यात मदत केली.
इंग्लंडही उपांत्य फेरीत दाखल –
इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडचा दणदणीत विजय झाला आहे.
हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडला उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
फलंदाजी करत इंग्लंडने न्यूझीलंडला 306 धावांचे आव्हान दिले.
इंग्लंड संघाचा फलंदाज बेअरस्टोवने धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे इंग्लंडला विजय मिळाला.
जॉनी बेअरस्टोव आणि जेसन रॉय यांनी 123 धावांची साथ संघाला दिली.
त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडवर 119 धावांनी विजय मिळवला आहे.