… तर खुशाल माझ्या थोबाडीत मारा – अजय देवगण

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टोटल धमाल’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटामध्ये अजय देवगण,अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, जॉनी लीव्हर, अर्शद वारसी,जावेद जाफरी,बोमन इरानी,संजय मिश्रा आणि ईशा गुप्ता यांच्या अभिनयाची प्रेक्षक तारीफ करत आहेत. मात्र या light comedy मधील एका गाण्यावर वाद निर्माण झालाय. ते म्हणजे ‘मुंगडा’ गाण्याच्या रिमिक्सवर!
सोनाक्षी सिन्हावर चित्रित करण्यात आलेल्या ‘मुंगडा रिमिक्स’ गाणं वादात अडकलं आहे. सोनाक्षीच्या हॉट अदांनी प्रेक्षक जरी घायाळ झाले असले, तरी लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर या ज्येष्ठ गायिकांनी या गाण्यावर आक्षेप करत आहे.
‘मुंगडा’ या गाण्यावर आक्षेप का ?
‘मुंगडा’ हे मूळ गाणं 70 च्या दशकात उषा मंगेशकर यांनी गायलं होतं.
1977 ला प्रदर्शित झालेल्या ‘इन्कार’ सिनेमातील या गाण्यावर हेलनचा डान्सही लोकप्रिय झाला होता.
‘टोटल धमाल’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा हिने ‘मुंगडा’ वर डान्स केला आहे.
यामुळे उषा मंगेशकर या सोनाक्षी सिन्हावर नाराज असल्याचं सांगण्यात येतंय.
गैर वाटत असेल तर खुशाल थोबाडीत द्या…
‘टोटल धमाल’ या चित्रपटाचा अभिनेता अजय देवगण याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, आता जुनी गाणी रिमिक्स मध्ये नव्याने येत आहेत.
तर मग ‘मुंगडा’ हे गाणं रिमिक्स मध्ये आलं आहे, तर यात वावगं काय?
लताजी या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, त्यांना काही वाईट वाटले असेल तर त्यांनी खुशाल थोबाडीत द्यावं, असे त्यांनी म्हटलं आहे.
त्या वयाने ज्येष्ठ आहेत, त्यामुळे मी त्यांनी थोबाडीत मारली तरी मी खाईन.