Monday, May 12, 2025 08:06:11 PM

चित्रपटांवर 100 टक्के कर! ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर काय परिणाम होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीय चित्रपटसृष्टीला धक्का दिला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीसोबतच, दक्षिणेकडील इंडस्ट्रीलाही अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ जाहीर केला आहे.

चित्रपटांवर 100 टक्के कर ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर काय परिणाम होणार
Donald Trump
Edited Image

नवी दिल्ली: जगभरातील देशांना आपल्या कर धोरणाने हादरवून टाकणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीय चित्रपटसृष्टीला धक्का दिला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीसोबतच, दक्षिणेकडील इंडस्ट्रीलाही अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ जाहीर केला आहे. याचा मोठा फटका भारतीय चित्रपटसृष्टीला बसणार आहे. अमेरिकन नसलेल्या चित्रपटांवर 100 टक्के कर लावण्याचा अर्थ असा की जर एखाद्या अमेरिकन वितरकाने शाहरुख खान किंवा अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे हक्क 10 लाख डॉलर्समध्ये खरेदी केले तर त्याला अमेरिकन सरकारला 10 लाख डॉलर्स कर म्हणून द्यावे लागतील.

यासंदर्भात घोषणा करताना ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिले की, 'अमेरिकन चित्रपट उद्योग वेगाने नष्ट होत आहे. इतर देश आपल्या चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपटांना आकर्षित करण्यासाठी भरपूर प्रोत्साहन देत आहेत, ज्यामुळे अमेरिकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. आम्ही इतर देशांमध्ये बनवलेल्या आणि येथे येणाऱ्या चित्रपटांवर ताबडतोब 100 टक्के कर लादत आहोत. आम्हाला पुन्हा अमेरिकेत चित्रपट बनवायचे आहेत.' 

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये चित्रपट निर्मिती वाढली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या देशांमध्ये चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि सरकारी अनुदाने, ज्यामुळे भारतीय चित्रपट निर्माते इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडे वळतात. पूजा फिल्म्सच्या बडे मियाँ आणि छोटे मियाँ यांनी इंग्लंड आणि अबू धाबी येथून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मोठी सबसिडी घेतली होती.

हेही वाचा - 30 वर्षीय अभिनेत्रीचा एजाज खानवर बलात्काराचा आरोप; म्हणाली, 'घरी घेऊन जाऊन...'

टॅरिफमुळे भारतीय चित्रपट निर्मात्यांना नुकसान होणार का? 

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे केवळ भारतीय चित्रपट उद्योगालाच नव्हे तर अमेरिकन बाजारात चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या संपूर्ण जगातील चित्रपट उद्योगांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन बाजारपेठेत तेलुगू चित्रपटांना मोठी बाजारपेठ आहे. अल्लू अर्जुन, प्रभास, ज्युनियर एनटीआर, राम चरण यांसारख्या मोठ्या भारतीय स्टार्सच्या चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय कलेक्शनपैकी जवळजवळ 70 % अमेरिकन बाजारपेठेतून येते. शाहरुख खानचे चित्रपट अमेरिकेतील त्यांच्या कलेक्शनमुळेच ब्लॉकबस्टर होतात.

हेही वाचा - वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग? छाया कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल

दरम्यान, शाहरुख खानच्या पठाण, जवान आणि डंकीला अमेरिकन बाजारपेठेतून आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर प्रतिसाद मिळाला आहे. परंतु आता 100 टक्के शुल्कामुळे वितरकांना या बाजारपेठेत प्रत्येक चित्रपटासाठी दुप्पट किंमत मोजावी लागेल. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा ओटीटीवरही मोठा परिणाम होणार आहे. 
 


सम्बन्धित सामग्री